Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मधील महिला एकेरी क्लास 9 या क्रीडा प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल बेबी सहाना रवी हिचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन


नवी दिल्‍ली, 20 ऑक्‍टोबर 2026

 

आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिला एकेरीच्या क्लास 9 या क्रीडा प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेबी सहाना रवी हिचे अभिनंदन केले आहे.

आपल्या पदार्पणातच स्टँडिंग श्रेणीमध्ये भारतासाठी पहिलेवहिले पदक जिंकून तिने इतिहास रचल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले आहे. हा अत्यंत अभिमानाचा क्षण युवा खेळाडूंना प्रेरणा देईल असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी बेबी सहाना रवी हिला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाने X या समाजमाध्यमावर सामायिक केलेला संदेश,

“बेबी सहाना रवी हिने आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धेत स्टँडिंग श्रेणीत भारतासाठी पहिलेवहिले पदक जिंकून इतिहास रचला! तिने पदार्पणातच महिला एकेरी क्लास 9 क्रीडा प्रकारात जिंकलेले कांस्य पदक अत्यंत उल्लेखनीय आहे. हा अत्यंत अभिमानाचा क्षण असून यामुळे निःसंशयपणे अधिकाधिक युवा खेळाडूंना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी प्रेरणा  मिळेल. तिचे अभिनंदन आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा : PM @narendramodi”

 

* * *

शैलेश पाटील/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai