Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियायी पॅरा खेळांमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल प्रदीप कुमार याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले


नवी दिल्‍ली, 20 ऑक्‍टोबर 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रदीप कुमार याचे अभिनंदन केले. प्रदीप कुमारने आशियायी पॅरा गेम्समधील पुरुषांच्या भालाफेक एफ53/54 प्रकारात, स्वतःची सर्वोत्तम कामगिरी नोंदवत सलग दुसऱ्यांदा रौप्य पदक पटकावले आहे.

मोदी यांनी नमूद केले की, गेल्या काही वर्षांतील या खेळाडूची प्रगती ही सतत सुधारणा करण्याच्या आणि स्वतःच्या मर्यादांना आव्हान देण्याच्या त्याच्या वचनबद्धतेचे दर्शन घडवते. सातत्य आणि उत्कृष्टता यांचा संगम दिसून येतो, असे म्हणत त्यांनी प्रदीप कुमारच्या या प्रशंसनीय कामगिरीबद्दल  अभिनंदन केले आणि त्याच्या भविष्यातील सर्व प्रयत्नांसाठी शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये म्हटले आहे की,

“सातत्य आणि उत्कृष्टता यांचा संगम!

प्रदीप कुमारने आशियायी पॅरा गेम्समधील पुरुषांच्या भालाफेक एफ53/54 प्रकारात, स्वतःची सर्वोत्तम कामगिरी नोंदवत सलग दुसऱ्यांदा रौप्य पदक पटकावले आहे. गेल्या काही वर्षांतील त्याची प्रगती ही सतत सुधारणा करण्याच्या आणि स्वतःच्या मर्यादांना आव्हान देण्याच्या त्याच्या कटिबद्धतेचे दर्शन घडवते. या प्रशंसनीय कामगिरीबद्दल त्याचे अभिनंदन! त्याच्या भविष्यातील सर्व प्रयत्नांसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा : PM @narendramodi”

 

* * *

शैलेश पाटील/राजेश शिरभाते/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai