Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि शिवराज सिंह चौहान यांचा एक लेख सामायिक केला आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि ग्रामीण समृद्धीला चालना देण्यासाठी ‘ॲग्रीव्होल्टेइक’ प्रणालीची क्षमता अधोरेखित केली आहे


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि शिवराज सिंह चौहान यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला आहे.

या लेखामध्ये, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि शिवराज सिंह चौहान यांनी शेतीला  सौरऊर्जा निर्मितीशी (ॲग्रीव्होल्टेइक) जोडून शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढवता येईल,याबद्दल लिहिले आहे. यात नमूद केले आहे की, ॲग्रीव्होल्टेइक प्रणालीद्वारे अतिरिक्त उत्पन्न मिळवता येते, ऊर्जेचा खर्च कमी करता येतो आणि पीक उत्पादकता वाढवण्यास मदत होते, ज्यामुळे शेतीला ऊर्जा पुरवण्याबाबत आणि ग्रामीण समृद्धीला चालना देण्याबाबत एक व्यावहारिक दृष्टिकोन मिळतो.

पंतप्रधान कार्यालयाने ‘X’  वर पोस्ट केले:

“केंद्रीय मंत्री @JoshiPralhad आणि @ChouhanShivraj यांनी ‘ॲग्रिव्होल्टेइक’ प्रणालीद्वारे, म्हणजेच शेतीला सौर ऊर्जा निर्मितीशी जोडून  शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढवता येईल, याबद्दल लिहिले आहे. त्यांनी नमूद केले आहे की, ही प्रणाली कशा प्रकारे अतिरिक्त उत्पन्न मिळवून देऊ शकते, ऊर्जेचा खर्च कमी करू शकते आणि पीक उत्पादकता वाढवण्यास मदत करू शकते.

शेतीला ऊर्जेची जोड देऊन ग्रामीण समृद्धीला चालना देण्याबाबत एक अत्यंत अभ्यासपूर्ण लेख.

https://indianexpress.com/article/opinion/columns/india-solar-farming-viksit-bharat-agrivoltaics-10929961/lite/

***

NehaKulkarni / SushamaKane / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai