Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल देवेंद्र कुमार याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले


हा विजय अत्यंत आनंदाचा क्षण असल्याचे नमूद करत, मोदी यांनी म्हटले की, हे यश पॅरा-स्पोर्ट्समधील भारताची उल्लेखनीय कामगिरी  दर्शवते. त्यांनी देवेंद्र कुमार याचे अभिनंदन केले आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’  वर पोस्ट करत म्हटले आहे :

“आशियाई पॅरा  क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या डिस्कस थ्रो F43/F44/F62/F64 प्रकारात देवेंद्र कुमार यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे! हा अत्यंत आनंदाचा क्षण असून, पॅरा-स्पोर्ट्समधील भारताची उल्लेखनीय कामगिरी  दर्शवते. सुवर्णपदक जिंकल्याबद्दल देवेंद्र याचे अभिनंदन! त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा: पंतप्रधान @narendramodi”

 

***

Neha Kulkarni / Sushma Kane / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai