Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत राकेशला रौप्यपदक मिळाल्याबद्दल पंतप्रधानांकडून अभिनंदन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या गोळाफेक प्रकारातील एफ43/एफ44/एफ62/एफ64 गटात उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक जिंकणाऱ्या राकेशचे अभिनंदन केले.

राकेशच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे संपूर्ण देशाला अतिशय आनंद झाला असल्याचे नमूद करून पंतप्रधानांनी त्याचे अभिनंदन केले आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’वरील संदेशात म्हटले आहे,

“राकेशच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताला रौप्यपदक मिळाले आहे!

पुरुषांच्या गोळाफेक प्रकारातील एफ43/एफ44/एफ62/एफ64 गटात अप्रतिम फेक करून त्याने संपूर्ण देशाला मोठा आनंद दिला आहे. त्याचे अभिनंदन आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा. पंतप्रधान.@narendramodi”

***

Neha Kulkarni / Nikhilesh Chitre / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai