आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धांमध्ये महिलांच्या गोळाफेक F34 प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत, तसेच वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाग्यश्री जाधव यांचे अभिनंदन केले. भाग्यश्री जाधव यांनी पुन्हा एकदा भारताचा गौरव वाढवला आहे, अशा शब्दांत त्यांनी प्रशंसा केली आहे.
मागील स्पर्धेच्या तुलनेत भाग्यश्री यांनी आपल्या कामगिरीत सुधारणा करत , उल्लेखनीय सातत्य आणि अधिक चांगली कामगिरी करण्याचा निर्धार प्रदर्शित केल्याचे नमूद करून, पंतप्रधानांनी या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यांची चिकाटी खरोखरच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने X वरील पोस्टमध्ये लिहिले आहे:
“आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धांमध्ये आणखी एक रौप्य पदक आणि नवीन वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी!
भाग्यश्री जाधव हिने महिलांच्या गोळा फेक F34 प्रकारात उत्कृष्ट फेक करत रौप्य पदक पटकावले आणि पुन्हा एकदा भारताचा गौरव वाढवला. मागील स्पर्धेच्या तुलनेत तिने आपल्या कामगिरीत सुधारणा करत, उल्लेखनीय सातत्य आणि अधिक चांगला खेळ प्रदर्शित करण्याचा निर्धार दर्शवला. या यशाबद्दल भाग्यश्रीचे अभिनंदन. तिची चिकाटी खरोखरच प्रेरणादायी आहे: पंतप्रधान @narendramodi”
Another Asian Para Games Silver and a new personal best!
Bhagyashree Jadhav has once again made India proud, securing Silver in the Women’s Shot Put F34 event with an excellent throw. Having improved her performance since the previous edition, she has demonstrated remarkable consistency and the determination to keep getting better. Congratulations to Bhagyashree on this well-deserved success. Her perseverance is truly inspiring: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 21, 2026
***
Nilima Chitale / Rajashree Agashe / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai