Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धांमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल हिमांशू नांदाल यांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले


आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक SB11 प्रकारात उत्तम वेळेसह कांस्यपदक जिंकून भारताच्या पदक तालिकेत आणखी एका पदकाची भर घातल्याबद्दल हिमांशू नांदाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, क्रीडा नैपुण्याप्रति त्याची वचनबद्धता कौतुकास्पद आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने X वरील पोस्टमध्ये लिहिले आहे:

“हिमांशू नांदालने भारताच्या पदकसंख्येत आणखी भर घातली! उत्तम वेळेची नोंद करत, त्याने आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक SB11 प्रकारात कांस्यपदक पटकावले. क्रीडा नैपुण्याप्रति त्याची वचनबद्धता कौतुकास्पद आहे. अभिनंदन आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा: पंतप्रधान  @narendramodi”

***

Nilima Chitale / Rajashree Agashe / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai