पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या गोळा फेक F46 प्रकारात, या हंगामातील आपली उत्कृष्ट फेक नोंदवत रौप्य पदक पटकावणाऱ्या मोहम्मद यासिर याचे अभिनंदन केले.
मागील स्पर्धेपासून आतापर्यंतचा त्याचा प्रवास हा अनेक वर्षांची चिकाटी, कठोर परिश्रम आणि सतत सुधारणा करत राहण्याच्या दृढनिश्चयाचे प्रतीक आहे, असे नमूद करत मोदी यांनी मोहम्मद यासिर याच्या या प्रशंसनीय कामगिरीचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
‘एक्स’ वरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे:
“मोहम्मद यासिर याने आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय प्रगती केली असून, पुरुषांच्या गोळाफेक F46′ प्रकारात या हंगामातील आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवत रौप्य पदक जिंकले आहे. मागील स्पर्धेपासूनचा त्याचा प्रवास हा अनेक वर्षांची चिकाटी, कठोर परिश्रम आणि सतत सुधारणा करत राहण्याच्या दृढनिश्चयाचे प्रतीक आहे. मोहम्मद यासिर याच्या या प्रशंसनीय कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा: पंतप्रधान @narendramodi”
Mohd Yasser has made remarkable progress at the Asian Para Games, securing Silver in the Men’s Shot Put F46 event with a season-best throw. His journey from the previous edition reflects years of perseverance, hard work and the determination to keep improving. Compliments to Mohd Yasser for this commendable performance and best wishes for the endeavours ahead: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 21, 2026
***
Nilima Chitale / Sushma Kane / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai