Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या कस्तुरी राजामणीचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या 67 किलोखालील वजनी गटात उत्कृष्ट कामगिरी करून रौप्यपदक पटकावणाऱ्या कस्तुरी राजामणीचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले. या कामगिरीमुळे भारताने या गटात प्रथमच पदक मिळवले आहे.

भारतीय पॅरा भारोत्तोलनात हा ऐतिहासिक टप्पा असल्याचे पंतप्रधान म्हणाले. कस्तुरीची चिकाटी आणि उत्कृष्ट कामगिरीसाठीची बांधिलकी यामुळे हे यश विशेष ठरले आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. त्यांनी कस्तुरीचे अभिनंदन केले.

पंतप्रधान कार्यालयाने ‘X’ या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटले आहे :

“भारतीय पॅरा भारोत्तोलनात हा ऐतिहासिक टप्पा आहे!

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या 67 किलोखालील वजनी गटात कस्तुरी राजामणीने उत्कृष्ट कामगिरी करून रौप्यपदक पटकावले आहे. या गटात भारताने प्रथमच पदक जिंकले आहे! तिची चिकाटी आणि उत्कृष्ट कामगिरीसाठीची बांधिलकी यामुळे हे यश विशेष ठरले आहे. कस्तुरीचे अभिनंदन : PM @narendramodi”

***

Nilima Chitale / Madhuri Pange / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai