आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या 100 मीटर T37 स्पर्धेत वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवत कांस्यपदक जिंकल्याबद्दल राकेशभाई भट्ट यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
ही एक शानदार स्प्रिंट होती आणि त्यांचा वेग, एकाग्रता आणि समर्पण भावनेने त्यांना या व्यासपीठावर योग्य स्थान मिळवून दिले, याबद्दल मोदी यांनी अभिमान व्यक्त केला, आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावरील पोस्टमध्ये लिहिले आहे:
“राकेशभाई भट्ट याची उत्कृष्ट धाव! आशियाई पॅरा गेम्स 2026 मधील पुरुषांच्या 100 मीटर T37 प्रकारात त्यांनी आपली वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवत कांस्यपदक जिंकले, याचा अभिमान आहे! त्याचा वेग, एकाग्रता आणि समर्पण यामुळे त्याला व्यासपीठावर योग्य स्थान मिळाले. त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा: पीएम @narendramodi”
A brilliant sprint by Rakeshbhai Bhatt! Very proud of him for winning the Bronze in the Men’s 100m T37 event at the Asian Para Games 2026, clocking a Personal Best. His speed, focus and dedication have earned him a well-deserved place on the podium. All the best for the endeavours ahead: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 21, 2026
***
Nilima Chitale / Madhuri Pange / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai