पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या भालाफेक एफ-55 प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक पटकावल्याबद्दल सुखचैन यांचे अभिनंदन केले.
सुखचैन यांचे हे यश त्यांची समर्पित वृत्ती, अनेक वर्षांची कठोर तयारी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्याचा दृढनिश्चय यांचे प्रतीक असल्याचे पंतप्रधान म्हणाले. त्यांच्या या कामगिरीमुळे देशाची मान उंचावली असून, भविष्यातील यशाचा मार्गही प्रशस्त झाला आहे, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’ या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटले आहे :
“आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये सुखचैन यांची प्रशंसनीय कामगिरी! त्यांनी पुरुषांच्या भालाफेक एफ-55 प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक पटकावले आहे. हे यश त्यांची समर्पित वृत्ती, अनेक वर्षांची कठोर तयारी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्याचा दृढनिश्चय यांचे प्रतीक आहे. देशाची मान उंचावल्याबद्दल सुखचैन यांचे मी अभिनंदन करतो. त्यांच्या या यशातून भविष्यात अशा अनेक यशांचा मार्ग प्रशस्त होवो, अशा शुभेच्छा : पंतप्रधान @narendramodi”
A commendable performance by Sukhchain at the Asian Para Games 2026! He has secured the Bronze Medal in the Men’s Javelin Throw F55 event with a fine throw. This success is a reflection of his dedication, years of rigorous preparation and determination to excel on the international stage. My congratulations to Sukhchain for bringing pride to the nation. May this achievement pave the way for many more successes: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 21, 2026
***
Nilima Chitale / Shraddha Mukhadekar / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai