नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर 2026
आशियाई पॅरा गेम्स 2026 मध्ये मिश्र दुहेरी क्लास एक्सडी7 प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल भाविना पटेल आणि शुभम वाधवा यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. या कामगिरीमुळे भारताने आशियाई पॅरा गेम्समध्ये मिश्र दुहेरी प्रकारात पहिले पदक पटकावले असून, भारतीय पॅरा टेबल टेनिसच्या इतिहासातील ही एक ऐतिहासिक घटना ठरली आहे.
“त्यांच्या सांघिक प्रयत्नांनी, समर्पणाने आणि दृढनिश्चयाने देशाला गौरवान्वित केले आहे,” असे मोदी यांनी म्हटले आहे. त्यांनी या दोन्ही खेळाडूंचे या महत्त्वपूर्ण यशाबद्दल अभिनंदन केले आणि त्यांना भविष्यातही अशाच यशासाठी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की,
“भारतीय पॅरा टेबल टेनिससाठी एक ऐतिहासिक कामगिरी!
भाविना पटेल आणि शुभम वाधवा यांनी आशियाई पॅरा गेम्स 2026 मध्ये मिश्र दुहेरी क्लास एक्सडी7 प्रकारात कांस्यपदक जिंकले आहे. या स्पर्धेत मिश्र दुहेरी प्रकारात भारताचे हे पहिलेच पदक आहे.
त्यांनी त्यांच्या सांघिक प्रयत्नाने आणि दृढनिश्चयाने देशाला गौरवले आहे.
या महत्त्वपूर्ण यशाबद्दल दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन! त्यांना भविष्यातही अशाच यशासाठी शुभेच्छा: PM @narendramodi”
A historic first for Indian Para Table Tennis!
Bhavina Patel and Shubham Wadhwa have won Bronze in the Mixed Doubles Class XD7 event at the Asian Para Games 2026, securing India’s first-ever medal in Mixed Doubles at the Games.
Their teamwork, dedication and determination have brought pride to the nation.
Congratulations to both athletes on this wonderful milestone. Wishing them continued success: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 22, 2026
* * *
राधिका अघोर/राजेश शिरभाते/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
A historic first for Indian Para Table Tennis! Bhavina Patel and Shubham Wadhwa have won Bronze in the Mixed Doubles Class XD7 event at the Asian Para Games 2026, securing India's first-ever medal in Mixed Doubles at the Games. Their teamwork, dedication and determination have brought pride to the nation. Congratulations to both athletes on this wonderful milestone. Wishing them continued success: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 22, 2026