नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शैलेश कुमार यांचे अभिनंदन केले. आशियाई पॅरा गेम्स 2026 मधील पुरुषांच्या उंच उडी अर्थात हाय जंप टी42/टी63 प्रकारात शैलेश कुमार यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आणि स्पर्धेतील नवा विक्रम प्रस्थापित केला.
मोदी म्हणाले की, ही एक उल्लेखनीय कामगिरी असून ती त्यांच्यातील कौशल्य, सातत्य आणि समर्पणाचे दर्शन घडवते. त्यांनी असेही नमूद केले की, भारताला त्यांचा अभिमान वाटतो.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स समाजमाध्यमावर पोस्ट करत म्हटले की,
“आशियाई पॅरा गेम्स 2026 मधील पुरुषांच्या हाय जंप टी42/टी63 प्रकारात शैलेश कुमार यांनी शानदार कामगिरी केली आहे! त्यांनी शानदार उडी मारत सुवर्णपदक जिंकले आणि स्पर्धेत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे! ही एक उल्लेखनीय कामगिरी असून ती त्यांच्यातील कौशल्य, सातत्य आणि समर्पणाचे प्रतीक आहे. भारताला त्यांचा अभिमान वाटतो: PM @narendramodi”
Shailesh Kumar has delivered a magnificent performance in the Men’s High Jump T42/T63 event at the Asian Para Games 2026, winning Gold with an impressive jump and setting a new Games Record! This is a remarkable accomplishment that reflects his talent, consistency and dedication. India is proud of him: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 22, 2026
* * *
सुषमा काणे/राजेश शिरभाते/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
Shailesh Kumar has delivered a magnificent performance in the Men's High Jump T42/T63 event at the Asian Para Games 2026, winning Gold with an impressive jump and setting a new Games Record! This is a remarkable accomplishment that reflects his talent, consistency and dedication. India is proud of him: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 22, 2026