Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी नित्या श्री सुमती सिवन हिचे केले अभिनंदन


नवी दिल्‍ली, 23 ऑक्‍टोबर 2026 

 

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत महिला एकेरीच्या एसएच-6 प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नित्या श्री सुमती सिवन हिचे अभिनंदन केले आहे.

मागील स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यानंतर यंदा रौप्यपदक मिळवणे ही उल्लेखनीय कामगिरी असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. नित्या हिची अशीच उत्तम कामगिरी सुरू राहो आणि तिच्यामुळे देशाचा गौरव वाढत राहो, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.

समाज माध्‍यम ‘एक्‍स’ वर पंतप्रधानांनी म्हटले आहे की,

“आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत महिला एकेरीच्या एसएच-6 प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल नित्या श्री सुमती सिवन हिचे अभिनंदन! मागील स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यानंतर यंदा रौप्यपदक जिंकणे ही उत्तम कामगिरी आहे. तिने अशीच चमकदार कामगिरी करत देशाचा गौरव वाढवत राहावे, हीच सदिच्छा : PM @narendramodi”

 

* * *

सुवर्णा बेडेकर/राज दळेकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai