Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या सार्वजनिक पदाच्या कार्यकाळात पायाभूत सुविधांचे नियोजन आणि अंमलबजावणी यांना मिळालेला आकार यावर प्रकाश टाकणारा नीती आयोगाचे सदस्य आणि माजी केंद्रीय सचिव राजीव गौबा यांचा एक लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला सामायिक


नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीती आयोगाचे सदस्य आणि माजी कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला आहे.

राजीव गौबा यांनी या लेखात, पंतप्रधानांच्या 25 वर्षांच्या सार्वजनिक कार्यकाळात पायाभूत सुविधांचे नियोजन आणि अंमलबजावणी यात कसे परिवर्तन घडत गेले, यावर प्रकाश टाकला आहे. या काळात स्वतंत्र प्रकल्पांपुरता मर्यादित दृष्टिकोन बाजूला ठेवून परस्परांशी समन्वय साधणाऱ्या आणि नागरिक केंद्रित दृष्टिकोनावर भर देण्यात येत आहे, हे गौबा यांनी अधोरेखित केले आहे. परिणामी, संपर्क व्यवस्था अधिक सक्षम होण्यास, जीवनमान सुलभ होण्यास आणि आर्थिक उत्पादकता वाढण्यास मदत होत असल्याचे गौबा यांनी या लेखात म्हटले आहे. 

 पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे :

“ नीती आयोगाचे सदस्य आणि माजी कॅबिनेट  सचिव राजीव गौबा, लिहितात की पंतप्रधान @narendramodi यांच्या 25 वर्षांच्या सार्वजनिक पदावरच्या कार्यकाळात पायाभूत सुविधांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्याच्या पद्धतीला नव्याने आकार देण्यात आला आहे.

स्वतंत्र प्रकल्पांपुरता मर्यादित दृष्टिकोन बाजूला ठेवून, संपर्क व्यवस्था, जीवनमान सुलभता आणि आर्थिक उत्पादकता सुधारणाऱ्या एकात्मिक, नागरिक-केंद्रित दृष्टिकोनावर भर दिला जात आहे.”

लेखाची लिंक 

https://indianexpress.com/article/opinion/columns/narendra-modi-gati-shakti-infrastructure-growthv-10936571/lite/

 
निलीमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai