Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी ग्रामीण विकास सचिव शैलेश कुमार सिंह यांनी लिहिलेला ‘लखपती दीदी’ उपक्रमाद्वारे ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण कसे होत आहे’, यावर प्रकाश टाकणारा लेख केला सामायिक


नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी ग्रामीण विकास सचिव शैलेश कुमार सिंह यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला आहे.

या लेखात, बचत गटांमधील सदस्य ते यशस्वी नवउद्योजक असा ग्रामीण महिलांचा प्रवास घडवून आणण्यात ‘लखपती दीदी’ उपक्रम कशाप्रकारे मदत करत आहे याचे वर्णन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे महिलांना शाश्वत उत्पन्न आणि अधिक आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यात मदत होत असल्याचे लेखात नमूद केलेले आहे. कौशल्य विकास, वित्तपुरवठा, बाजारपेठा आणि सामुदायिक संस्थांच्या माध्यमातून महिलांना स्वतःचे उद्योग उभारण्यास, आर्थिक निर्णय घेण्यास आणि स्वतःचे भविष्य घडवण्यास सक्षम बनवले जात असल्याचेही या लेखात अधोरेखित करण्यात आले आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’ या समाज माध्यमांवरील संदेशात म्हटले आहे :

“स्वयं-सहायता गटांपासून ते यशस्वी नवउद्योजक बनण्यापर्यंतचा प्रवास करत ग्रामीण महिला सक्षमीकरणाची एक नवी गाथा घडवत आहेत!

माजी ग्रामीण विकास सचिव  शैलेश कुमार सिंह यांनी लिहिलेल्या लेखात, ‘लखपती दीदी’ हा उपक्रम ग्रामीण महिलांना शाश्वत उत्पन्न आणि अधिक आर्थिक स्वातंत्र्याकडे वाटचाल करण्यास कशी मदत करत आहे, याची माहिती दिली आहे.

कौशल्य विकास, वित्तपुरवठा, बाजारपेठा आणि सामुदायिक संस्थांच्या माध्यमातून महिलांना स्वतःचे उद्योग उभारण्यास, आर्थिक निर्णय घेण्यास आणि स्वतःचे भविष्य घडवण्यास कसे सक्षम करत आहे, यावर त्यांनी या लेखात प्रकाश टाकला आहे.”

सुवर्णा बेडेकर/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai