Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनीला येथे 21 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेला संबोधित केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनीला येथे 21 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेला संबोधित केले


सध्याच्या संकट आणि संघर्षांच्या काळात, शांततेसाठी केल्या जाणाऱ्या सर्व प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी संवाद, परस्पर सन्मान आणि सहकार्याची गरज असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. मुक्त, खुले, समावेशक आणि नियमांवर आधारित हिंद-प्रशांत क्षेत्राचे आवाहन करताना, पंतप्रधानांनी जागतिक स्तरावर शांतता, स्थिरता आणि निश्चितता आणण्यासाठी ईएएसने योगदान द्यावे, असे आवाहन केले.

 संकट आणि संघर्षांचा जगभरातील अन्न, इंधन आणि खत सुरक्षेवर परिणाम होत असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले. आंतरराष्ट्रीय जलमार्गांवर वारंवार लक्ष्य केल्या जात असलेल्या व्यापारी जहाजांच्या आणि खलाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्याचे त्यांनी आवाहन केले. तसेच युक्रेन आणि पश्चिम आशियात सुरू असलेला संघर्ष शांततापूर्ण मार्गाने सोडवण्यासाठी केल्या जाणाऱ्या सर्व प्रयत्नांना भारताचा पाठिंबा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. दहशतवादामुळे शांतताप्रिय समाजापुढे धोका निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.

 

ईएएस मंचावरील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी, पंतप्रधानांनी खालील प्रस्ताव मांडले:

    I.      संयुक्त प्रशिक्षण आणि आपत्कालीन प्रतिसादातील सहकार्यासाठी ‘नाविकांची सुरक्षा उपक्रम’

   II.      नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी येथे आयोजित ‘ईएएस सायबर क्राईम’ परिषदेत ‘ऑनलाइन फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांमुळे निर्माण होणारे नव्या युगातील धोके’ या विषयावर चर्चा आयोजित करणे.

  III.      लोथल येथे ईएएस सागरी वारसा महोत्सवाचे आयोजन.

 IV.      ईएएस देशांबरोबरचे शैक्षणिक सहकार्य वाढवण्यासाठी नालंदा येथे ‘ ईएएस विद्यापीठ परिषदेचे’ आयोजन.

पंतप्रधानांनी फिलीपिन्सचे अध्यक्ष फर्डिनांड आर. मार्कोस यांचे, शिखर परिषदेचे यशस्वीपणे  आयोजन केल्याबद्दल अभिनंदन केले.

पंतप्रधानांचे संपूर्ण भाषण येथे पाहावे [link].

***

Nilima Chitale / Rajashri Agashe / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai