उभय नेत्यांनी सप्टेंबर 2025 मधील पंतप्रधान वोंग यांच्या भारत भेटीदरम्यान स्वीकारलेल्या ‘सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीसाठी मार्गदर्शक आराखडा ‘ अंतर्गत झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच, आर्थिक सहकार्य, कौशल्य विकास, डिजिटलायझेशन, शाश्वतता, संपर्क व्यवस्था ,आरोग्यसेवा व वैद्यकीय क्षेत्र, संरक्षण व सुरक्षा सहकार्य, आणि लोकांमधील आदानप्रदान व सांस्कृतिक देवाणघेवाण अशा आठ प्राधान्य क्षेत्रांमधील पुढील वाटचालीबाबत चर्चा केली. तसेच प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही त्यांनी विचारांचे आदान-प्रदान केले.
पंतप्रधानांनी सिंगापूरच्या आगामी ‘आसियान’ अध्यक्षपदासाठी शुभेच्छा दिल्या आणि या अध्यक्षपदाच्या यशस्वी वाटचालीला भारताचा पूर्ण सहयोग राहील असे आश्वासन पंतप्रधान वोंग यांना दिले.
***
Nilima Chitale / Sushma Kane / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai