Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी घेतली प्रिन्स व प्रिन्सेस ऑफ वेल्स यांची भेट


भारत युके दृष्टीकोन 2035 च्या मार्गदर्शनानुसार आणि जुलै 2026 मध्ये झालेल्या इंडिया युके सर्वसमावेशक आर्थिक व व्यापार करार (सीइटीए) अंमलबजावणीच्या पाठबळामुळे भारत युके द्विपक्षीय संबंधांची गती वाढत असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.

पर्यावरणविषयक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवोन्मेषी पर्यायांना प्रोत्साहन देणाऱ्या अर्थशॉट प्राइझ संस्थेची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. या संस्थेने भारतीय नवोन्मेषक व त्यांनी जागतिक पर्यावरणविषयक समस्यांवर पर्याय शोधण्यासाठी दिलेले योगदान यांची घेतलेली दखल तसेच मुंबईमध्ये 17 नोव्हेंबर 2026 रोजी झालेला अर्थशॉट पुरस्कार समारंभ यांची त्यांनी प्रशंसा केली.   

भारत युके सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी आणखी वाढविण्याबाबतचे विचार दोन्ही देशांनी या बैठकीत व्यक्त केले. यामध्ये संरक्षण, आरोग्य, शिक्षण, वित्ततंत्रज्ञान या क्षेत्रांमधील सहकार्य आणि परस्पर नागरी संबंध याविषयी चर्चा करण्यात आली.

पंतप्रधानांनी यावेळी किंग चार्ल्स तृतीय आणि पंतप्रधान अँडी बर्नहम यांना देखील हार्दिक शुभेच्छा दिल्या.

***

Shailesh Patil / Surekha Joshi / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai