Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

शेतकऱ्यांची समृद्धी वाढवण्यासाठी आणि देशाच्या ग्रामीण भागाचे सक्षमीकरण करण्यासाठी हाती घेतलेल्या परिवर्तनकारी उपक्रमांवरील लेख पंतप्रधानांनी केला सामायिक


नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा एक लेख सामायिक केला आहे. गेल्या 12 वर्षांत विकसित केलेल्या स्वदेशी लसी, पशुधन तसेच कुक्कुटपालन केंद्रातील पक्ष्यांचे संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण करण्यात कशी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत ही बाब या लेखातून अधोरेखित करण्यात आली आहे. यादृष्टीने होत असलेल्या प्रयत्नांमुळे प्राण्यांचे आरोग्य जपण्यास, रोगांमुळे होणारे नुकसान कमी करण्यास, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास आणि एकुणात शेतकरी समुदायाच्या जीवनमानाची गुणवत्ता सुधारण्यास मदत झाली आहे.

स्वदेशी लसींच्या विकासातून पशुवैद्यकीय आरोग्य सेवा क्षेत्रातील भारताची वाढती क्षमता, तसेच एक लवचिक आणि आत्मनिर्भर कृषी परिसंस्था उभारण्याच्या वचनबद्धतेची प्रचिती येते असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले आहे.

यासंदर्भात पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश:

गेल्या 12 वर्षांत शेतकरी बंधू भगिनींच्या समृद्धीसाठी आणि देशाच्या ग्रामीण भागाचे सक्षमीकरण करण्याच्या दिशेने अनेक ऐतिहासिक पावले उचलली गेली आहेत. स्वदेशी लसी विकसित झाल्यामुळे पशु पक्ष्यांचे संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण करण्यात कशा रितीने मदत होत आहे, याबद्दल केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री @ChouhanShivra यांनी आपल्या या लेखात सविस्तर मांडणी केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासोबतच, त्यांचे जीवनमानही अधिक चांगले आणि सुलभ झाले आहे.

निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai