Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कौशल्य विकासावर भारताचा वाढता भर आणि कौशल्य प्रशिक्षणाला करिअरचा पसंतीचा पर्याय बनवण्याच्या प्रयत्नांवरचा लेख पंतप्रधानांनी केला सामायिक


नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी यांचा कौशल्य विकासाला प्राधान्य देण्यासंदर्भातील एक लेख केला सामायिक केला आहे. या लेखात देशातील कौशल्य विकासावर वाढता भर आणि कौशल्य प्रशिक्षणाला करिअरचा पसंतीचा पर्याय बनवण्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

आगामी वर्ल्डस्किल्स एशिया 2027 आयटीआय संस्थांच्या श्रेणीवाढीसाठीचा पीएम-सेतू उपक्रम आणि उद्योगांशी संलग्न प्रशिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा उल्लेख चौधरी यांनी या लेखात केला आहे.कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या नव्या संधींसाठी या उपक्रमांच्या माध्यमातून युवकांना तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स या सामाजिक माध्यमावरील संदेशात म्हटले आहे की, भारत कौशल्य विकासाच्या प्रवासाला जागतिक पातळीवर घेऊन जात आहे!

केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी देशातील कौशल्य विकासावर वाढता भर आणि कौशल्य प्रशिक्षणाला करिअरचा पसंतीचा पर्याय बनवण्याच्या महत्त्वाविषयी लेख लिहिला आहे. या लेखात त्यांनी आगामी वर्ल्डस्किल्स एशिया 2027, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या श्रेणीवाढीसाठीचा पीएम- सेतू उपक्रम आणि उद्योगांशी संलग्न प्रशिक्षण व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी या उपक्रमांच्या माध्यमातून युवकांना सज्ज करण्यात येत असल्याचेही त्यांनी लेखात नमूद केले आहे.

राधिका अघोर/राज दळेकर/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai