Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महिला सक्षमीकरण आणि महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पंतप्रधानांचा पुनरुच्चार


 

संसद आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना अधिक राजकीय प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी सरकार ठामपणे कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी आज केला.

संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरील एक्स या मंचावरून एक व्हिडिओ संदेश प्रसारित केला. महिला आरक्षणाची मागणी गेल्या अनेक दशकांपासून होत असून, देशभरातील असंख्य महिलांनी पत्रांद्वारे आणि प्रत्यक्ष भेटीगाठींतून ही अपेक्षा व्यक्त केली आहे, असे त्यांनी या संदेशात नमूद केले.

महिला सक्षमीकरणासाठी सरकारचा ठाम संकल्प असून, देशभरातील स्त्री -शक्तीचा त्याला पाठिंबा असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमावर केलेल्या एका संदेशात म्हटले आहे की, 

आम्ही स्त्री शक्तीला एक आश्वासन दिले होते आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्ही आजही कटिबद्ध आहोत.

 ***

राधिका अघोर/राज दळेकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]