Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राजस्थानमधील बलवंत कुमावत या युवकाने घेतली पंतप्रधानांची भेट

राजस्थानमधील बलवंत कुमावत या युवकाने घेतली पंतप्रधानांची भेट


राजस्थानमधील भिलवाडा येथील बलवंत कुमावत या युवकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली. नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत अशी तीव्र इच्छा कुमावत याने व्यक्त केली होती. दोन वर्षांपूर्वी या युवकाने नरेंद्र मोदी यांच्याशी भेट होईपर्यंत पायात पादत्राणे न घालण्याची शपथ घेतली होती. तेव्हापासून तो अनवाणी वावरत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज नवी दिल्ली येथे या युवकाची भेट झाल्यावर त्याचा संकल्प पूर्ण झाला. या युवकाने त्यानंतर पायात चपला चढवल्या. या ऊर्जेचा वापर राष्ट्रउभारणीच्या कामामध्ये करावा, असा सल्ला पंतप्रधानांनी कुमावत याला दिला. तसेच शरीराला त्रास होईल, अशा प्रकारची कोणतीही शपथ यापुढे घेऊ नये, असे सांगितले.

S.Patil/S.Tupe