पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने पुढील निर्णयांना कार्योत्तर मंजुरी दिली.
• सहकारी बँकांना 4.5 टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करण्यासाठी नाबार्ड बाजारातील व्याजदराने सुमारे 20 हजार कोटी रुपयांचे अल्प काळासाठी कर्ज घेणार
• केंद्रीय अर्थसंकल्पाद्वारे यासाठी नाबार्डला 2 हजार कोटी रुपये अतिरिक्त भांडवल पुरवणार. सुरुवातीला 2016-17 वर्षातच नाबार्डला 500 कोटी रुपयांचे अतिरिक्त भांडवल पुरविणार
• कृषी, सहकार्य आणि शेतकरी कल्याण विभागाच्या योजनेनुसार 1.8 टक्के व्याजमाफी आणि 0.2 टक्के नाबार्डचा प्रशासकीय खर्च दिला जाणार. व्याजमाफीचे प्रमाण, नाबार्ड ज्या दराने निधी उभारतो त्यावर अवलंबून राहील.
• क्रियाशील किसान क्रेडिट कार्डांचे रुपे/एटीएम प्रणित किसान क्रेडिट कार्डात रुपांतर करण्यासाठी नाबार्ड समन्वय साधणार
चांगला पाऊस आणि कर्जाची वाढती मागणी या पार्श्वभूमीवर तसेच कृषी उत्पादनाला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना सहकारी बँकांनी मदत करणे गरजेचे आहे.
या मंजुरीमुळे शेतकऱ्यांना सहकारी बँकांकडून कमी व्याजदरात अल्प काळासाठी पीक कर्ज उपलब्ध होईल. किसान क्रेडिट कार्डांचे रुपे/एटीएम संचालित किसान क्रेडिट कार्डात रुपांतर झाल्यावर सुलभ पतपुरवठा होईल आणि शेतकऱ्यांकडून डिजिटल आणि रोकडविरहित व्यवहार होतील.
B.Gokhale/S.Kane/P.Kor