Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ओदिशाच्या अनुसूचित जातींच्या यादीत बदल करण्यासाठी संविधान आदेश, 1950 आणि पाँडिचेरीचे नाव पुदुच्चेरी करण्यासाठी संविधान आदेश 1964 मध्ये सुधारणा करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने ओदिशाच्या अनुसूचित जातींच्या यादीत बदल करण्यासाठी संविधान (अनुसूचित जाती) आदेश, 1950 आणि पाँडिचेरीचे नाव पुदुच्चेरी करण्यासाठी संविधान (पाँडिचेरी) अनुसूचित आदेश 1964 मध्ये सुधारणा करायला मंजुरी दिली. वरील बदलांसह नवीन संविधान (अनुसूचित जाती) आदेश (सुधारणा) विधेयक 2017 संसदेत मांडण्यात येईल.

ओदिशाच्या अनुसूचित जातींच्या यादीत समावेश करण्यासाठी स्वालागिरी जात पात्र ठरली आहे. तसेच पाँडिचेरी (नावात बदल) कायदा 2006 द्वारे 1 ऑक्टोबर 2006 पासून पाँडिचेरीचे नाव पुदुच्चेरी असे बदलण्यात आले आहे. त्यानुसार संविधान (पाँडिचेरी) अनुसूचित जाती आदेश 1964 मध्ये सुधारणा आवश्यक आहे.

B.Gokhale/S.Kane/Anagha