पीएम्इंडिया
भारत आणि संयुक्त राष्ट्राच्या लिंग समानता आणि महिला सबलीकरण संस्था(यूएन -वूमन) यांच्यातल्या करारावर स्वाक्षऱ्या करायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. कायदे, धोरणे आणि कार्यक्रमाद्वारे,लिंग समानतेसाठी पंचायत राज संस्थांसह ,संबंधित संस्थांच्या क्षमता मजबूत करण्यासाठी पंचायत राज मंत्रालयाला तांत्रिक सहाय्य पुरवण्यासंदर्भातला हा प्रस्ताव आहे. निवडून आलेल्या महिला प्रतिनिधीच्या क्षमता वृद्धीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि पंचायत राज संस्थांमध्ये महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी पंचायत मंत्रालय आणि यूएन -वूमेन यांनी सहयोगाने कार्य करायचा निर्णय घेतला आहे.
आंध्र प्रदेश,तेलंगणा,ओडिशा,कर्नाटक,राजस्थान आणि मध्य प्रदेश या सहा राज्यात जिल्हा आणि उप जिल्हा स्तरावर या सामंजस्य करारांतर्गत कृती अंमलबजावणी करण्यात येईल.
N.Sapre/N.Chitale/Anagha