Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रसारण माध्यमांना संबोधन

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रसारण माध्यमांना संबोधन


मित्रांनो स्वागत,

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील सुट्टीनंतर पुन्हा एकदा आपण सगळे भेटत आहोत. अधिवेशनात अर्थसंकल्पावर विस्तृत चर्चा होईल आणि चर्चा व वादाचा स्तर चांगल्या गुणवत्तेचा असेल, याची मला खात्री आहे. गरीबांच्या कल्याणावर चर्चा केंद्रीत असेल. वस्तू आणि सेवा करा संदर्भात आम्ही आशावादी आहोत. सर्व राज्यांनी यासाठी सकारात्मक सहाय्य केले आहे हे आमच्या आशेचे एक कारण आहे. सर्व राजकीय पक्षांनी सुध्दा सकारात्मक पध्दतीने सहकार्य केले आहे. लोकशाही पध्दतीने या मुद्दयावर विस्तृत चर्चा केल्यानंतर काही निर्णयावर सहमती झाली असून यासंदर्भात गती मिळत आहे. या अधिवेशनात वस्तू आणि सेवा कराची प्रक्रिया पूर्ण व्हावी यासाठी सर्वांचे सहकार्य मिळविण्याकरिता प्रयत्न सुरु आहेत. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आभार.

B.Gokhale/S.Kulkarni/Anagha