Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उत्तर प्रदेशमध्ये नवीन सरकारचा शपथविधी, पंतप्रधानांकडून अभिनंदन

उत्तर प्रदेशमध्ये नवीन सरकारचा शपथविधी, पंतप्रधानांकडून अभिनंदन


उत्तर प्रदेशमध्ये नव्याने सत्तेवर आलेल्या सरकारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. योगी आदित्यनाथ, केशव प्रसाद मौर्य, दिनेश शर्मा आणि इतर नवीन मंत्री म्हणून आज ज्यांनी शपथ घेतली त्या सर्वांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले. या चमूकडून उत्तर प्रदेशची प्रगती होईल, असा आपल्याला विश्वास आहे. आणि ज्यावेळी उत्तर प्रदेशची प्रगती होईल त्यावेळी संपूर्ण देशाचीही प्रगती होणार असल्याचा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे.

B.Gokhale/S.Bedekar/Anagha