पीएम्इंडिया
भारत आणि सर्बिया यांच्यातील सध्या अस्तित्वात असलेल्या हवाई सेवा करारामध्ये बदल करून नवा करार करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. हा करार 31 जानेवारी 2003 रोजी करण्यात आला होता. सध्याच्या काळात नागरी हवाई क्षेत्रातल्या घडामोडींना विचारात घेऊन आयसीएओ अर्थात आंतरराष्ट्रीय नागरी हवाई संघटनेने निर्धारित केलेल्या आधुनिक मार्गदर्शक तत्वांना अनुसरून या सुधारणा करण्यात आल्या आहेत. दोन्ही देशांदरम्यान हवाई सेवा सुविधा सुधारणा हा या नव्या कराराचा उद्देश आहे. या नव्या सुधारित आणि उदारमतवादी करारामुळे भारत आणि सर्बिया यांच्यातील व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढीला लागण्याची अपेक्षा आहे. दोन्ही देशांच्या विमान कंपन्यांना सुरक्षितता आणि सुरक्षा यांची हमी मिळण्याबरोबरच अधिक जास्त व्यावसायिक संधी उपलब्ध होणार आहेत.
N.Sapre/S.Patil/Anagha