पीएम्इंडिया
आयसीसी जागतिक क्रिकेट विश्वचषक 2015 या स्पर्धेत सहभागी झालेल्या सार्क देशांच्या प्रमुखांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सार्कमधील पाच राष्ट्रे या स्पर्धेत खेळत आहेत. राष्ट्रपती @ अश्रफ घनी, पंतप्रधान शेख हसीना, पंतप्रधान नवाझ शरीफ, राष्ट्राध्यक्ष सिरीसेना यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधून शुभेच्छा व्यक्त केल्या.
जागतिक विश्वचषक स्पर्धा खिलाडू वृत्तीने खेळल्या जातील आणि क्रीडाप्रेमींसाठी ही स्पर्धा म्हणजे पर्वणी ठरेल याची खात्री असल्याचे पंतप्रधान म्हटले आहे.
क्रिकेट आपल्या प्रदेशातल्या लोकांना जोडते,सद्भावना वाढवते. सार्क देशातले खेळाडू आपल्या प्रांताचा सन्मान वाढवतील अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.
आपले संबंध अधिक मजबूत होण्यासाठी, नवे परराष्ट्र सचिव लवकरच सार्क दौऱ्यावर जाणार असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.