Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

काबूल इथल्या दहशतवादी स्फोटाचा पंतप्रधानांकडून निषेध


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काबूल इथल्या दहशतवादी स्फोटाचा तीव्र निषेध केला आहे. काबूलमधल्या दहशतवादी स्फोटाचा आम्ही तीव्र निषेध करतो. मृतांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी आहोत असे सांगून जखमींच्या प्रकृतीला लवकर आराम वाटावा अशी सदिच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.

दहशतवादाविरोधातल्या लढ्यात भारत सदैव अफगाणिस्तानसमवेत राहील. दहशतवादाला पाठबळ पुरवणाऱ्या शक्तींचा पाडाव होणे गरजेचे असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/N.Chitale/P.Kor