Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

चार नव्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिजाईनच्या संचालकपदांची निर्मिती


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत आज, कुरुक्षेत्र (हरियाणा), भोपाळ (मध्य प्रदेश), जोरहाट (आसाम), विजयवाडा (आंध्र प्रदेश) या चार स्थापन झालेल्या नव्या ठिकाणी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या चार संचालकपदांची निर्मिती करण्यास मंजूरी देण्यात आली.

फेब्रुवारी 2014 मध्ये झालेल्या बैठकीतच या चार संचालकांच्या वेतनासह इतर आर्थिक बाबींना मान्यता देण्यात आली आहे.

पार्श्वभूमी

फेब्रुवारी 2007 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने नॅशनल डिझाईन पॉलिसी मंजूर केली आहे. त्याअंतर्गत अहमदाबाद येथील संस्थेच्या धर्तीवर चार नव्या संस्थांची उभारणी करण्याचा समावेश होता. यामुळे डिजाईन क्षेत्रात देशभर गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रसार होईल.

S. Thakur/N.Sapre