पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 1 जुलै 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय डॉक्टर दिना निमित्त देशभरातील डॉक्टरांना शुभेच्छा देत त्यांची अढळ सेवावृत्ती, संवेदनशीलता व देशाप्रती असलेली निष्ठा याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
मोदी म्हणाले की, डॉक्टरांचे कठोर परिश्रम, संवेदनशीलता आणि समर्पण ही भारताच्या आरोग्यसेवा प्रणालीचा कणा आहेत. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीतही त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे त्यांना देशभरातील अगणित लोकांचा विश्वास आणि कृतज्ञता प्राप्त झाली आहे. असेही त्यांनी अधोरेखित केले आहे.
गेल्या दशकात आरोग्यसेवा क्षेत्रात झालेल्या प्रगतीवर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले की, भारताने आपली वैद्यकीय सेवा परिसंस्था मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. देशातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या दुप्पट झाली आहे, तसेच पदवीपूर्व आणि पदव्युत्तर वैद्यकीय जागांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. ही अभूतपूर्व वाढ वैद्यकीय क्षेत्राची आवड असलेल्या तरुणांसाठी अधिक संधी निर्माण करत असून वैद्यकीयसेवा मनुष्यबळ बळकट करत आहे आणि देशाच्या कानाकोपऱ्यात दर्जेदार वैद्यकीय सेवा पोहोचण्याची खात्री देत आहे, असे ते म्हणाले.
मोदी यांनी ऑपरेशन अमिस्ताद अंतर्गत व्हेनेझुएलामध्ये सेवा बजावणाऱ्या भारतीय डॉक्टर आणि वैद्यकीय व्यावसायिकांच्या समर्पणाचीही प्रशंसा केली. ते म्हणाले की, आव्हानात्मक काळात त्यांची निस्वार्थ सेवा हे दाखवते की, जेव्हा जेव्हा समाजाला संकटाचा सामना करावा लागतो, तेव्हा वैद्यकीयसेवेचे व्यावसायिक नेहमीच समर्थपणे पुढाकार घेतात.
पंतप्रधानांनी आपल्या एक्स या समाजमाध्यमावर वर पोस्ट केले आहे की,
डॉक्टर दिनानिमित्त, आमच्या सर्व समर्पित डॉक्टरांना शुभेच्छा. त्यांचे कठोर परिश्रम, संवेदनशीलता आणि निष्ठा भारताच्या वैद्यकीय सेवा प्रणालीचा कणा आहेत. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीतही त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे त्यांना असंख्य लोकांचा विश्वास आणि कृतज्ञता प्राप्त झाली आहे.
गेल्या दशकात, भारताने आपली वैद्यकीय सेवा परिसंस्था मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या दुप्पट झाली आहे आणि पदवीपूर्व व पदव्युत्तर वैद्यकीय जागांमध्येही मोठी वाढ झाली आहे. ही अभूतपूर्व वाढ वैद्यकीय क्षेत्राची आवड असलेल्या तरुणांसाठी अधिक संधी निर्माण करत आहे, आरोग्यसेवा मनुष्यबळ बळकट करत आहे आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याची खात्री देत आहे.
विकसित भारत घडवण्याच्या दिशेने आपण वाटचाल करत असताना, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला चालना देणे, वैद्यकीय संशोधनाला गती देणे, नाविन्यपूर्ण गोष्टींचा स्वीकार करणे आणि सर्वांना परवडणारी व सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे यांत आमचे डॉक्टर महत्त्वपूर्ण भूमिका बजावत राहतील.
आज डॉक्टर्स डे साजरा करत असताना, ऑपरेशन अमिस्ताद अंतर्गत व्हेनेझुएलामध्ये अहोरात्र सेवा बजावणाऱ्या भारतातील सर्व डॉक्टर्स आणि वैद्यकीय व्यावसायिकांचे मी कौतुक करू इच्छितो. अशा कठीण काळात गरजूंना सेवा देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे याचे उत्तम उदाहरण आहे. जेव्हा जेव्हा आपल्या समाजासमोर एखादे आव्हान उभे राहते, तेव्हा वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिक कशा प्रकारे प्रसंगाला साजेसे कार्य करून पुढाकार घेतात. याचे ते द्योतक आहे.
On Doctors’ Day, greetings to our dedicated doctors, whose hard work, compassion and commitment form the backbone of India’s healthcare system. Their tireless efforts, often in the most challenging circumstances, have earned the trust and gratitude of countless people.
Over the…
— Narendra Modi (@narendramodi) July 1, 2026
Today, as we mark Doctors’ Day, I would like to appreciate all the doctors and medical professionals from India who are tirelessly working in Venezuela, as a part of #OperationAmistad. In such a challenging time, their efforts to serve those in need are shining examples of how… https://t.co/IXhEse64ev
— Narendra Modi (@narendramodi) July 1, 2026
* * *
नेहा कुलकर्णी/राजेश शिरभाते/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
On Doctors' Day, greetings to our dedicated doctors, whose hard work, compassion and commitment form the backbone of India's healthcare system. Their tireless efforts, often in the most challenging circumstances, have earned the trust and gratitude of countless people.
— Narendra Modi (@narendramodi) July 1, 2026
Over the…
Today, as we mark Doctors’ Day, I would like to appreciate all the doctors and medical professionals from India who are tirelessly working in Venezuela, as a part of #OperationAmistad. In such a challenging time, their efforts to serve those in need are shining examples of how… https://t.co/IXhEse64ev
— Narendra Modi (@narendramodi) July 1, 2026