Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि पेलेस्टाईन दरम्यान कृषी सहकार्य सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत , भारत आणि पेलेस्टाईनच्या कृषी मंत्रालयांमधल्या सामंजस्य कराराला मंजुरी देण्यात आली .

मे 2017 मध्ये पेलेस्टाईनचे मंत्री भारत दौऱ्यावर आले असतांना हा करार करण्यात आला होता.

या करारामुळे, कृषीसह, पशुसंवर्धन आणि पशुवैद्यक क्षेत्रात भारताला पेलेस्टाईनचे सहकार्य मिळू शकेल. तसेच रोप आणि भूमी पोषण, आधुनिक सिंचन तंत्रज्ञान या विविध क्षेत्रातही परस्पर सहकार्य केले जाईल.

या सामंजस्य कराराअंतर्गत, एक कृषी निरीक्षण समितीही तयार केली जाईल.

B.Gokhale/R.Aghor/Anagha