Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

दोन राष्ट्रांच्या दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रवाना होणार; आयर्लंडला भेट देणार; उद्या संध्याकाळपर्यंत न्यूयॉर्कमध्ये आगमन


पंतप्रधान नरेंद्र मोदी, दोन राष्ट्रांच्या दौऱ्यासाठी उद्या सकाळी रवाना होणार आहेत.
डब्लिन, आयर्लंडमध्ये आगमन झाल्यानंतर, पंतप्रधान आयर्लंड सरकारप्रमुख एन्डा केनी यांच्याशी चर्चा करतील. न्यूयॉर्कला निघण्यापूर्वी पंतप्रधान आयर्लंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत.

न्यूयॉर्कला पंतप्रधानांचे उद्या संध्याकाळी (स्थानिक वेळेनुसार) आगमन होणार आहे.

N.Chitale/S.Tupe