Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ईशान्येकडील भागांमध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे पंतप्रधानांना यातना


ईशान्येकडील विविध भागांमध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यातना झाल्याचे म्हटले आहे.

“ईशान्येकडील विविध भागांमध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थिती पाहून मला यातना होत आहेत, पूरग्रस्त भागांमधील नागरिकांच्या दु:खात मी सहभागी आहे.

या प्रसंगी ईशान्येकडील लोकांच्यासोबत संपूर्ण देश उभा आहे. परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य केले जाईल, अशी ग्वाही केंद्र सरकार देत आहे.

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यासह दिल्ली तसेच इतर राज्यांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पूर परिस्थितीबाबत मी चर्चा केली.

माझे सहकारी किरण रिजीजू यांनी बचाव कार्य आणि मदतीवर देखरेख ठेवून शक्य ती सर्व मदत करावी, असे मी त्यांना सांगितले आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.

N.Sapre/Madhuri/Darshana