पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये संरक्षण मंत्रालयाअंतर्गत ‘इंडियन डिफेन्स अकौंटस् सर्व्हिस’ने घेतलेल्या आढाव्याला मान्यता देण्यात आली. या निर्णयानुसार संरक्षण खात्यामध्ये आता 23 नवीन पदे तयार करण्यात आली आहेत. यामध्ये एक अॅपेक्स स्केलचे आहे. तर 6 पदे एचएजी स्तराची आहेत. तसेच 6 पदे एसएजी आणि 10 पदे जेएजी स्तरावरील आहेत. याचबरोबर एचएजी प्लस स्तरावरील एक पद कमी करण्यात आले आहे. आणि एसटीएस स्तरावरील 12 तसेच जेटीएस स्तरावरील 10 पदे कमी करण्यात आली आहेत.
सेवेतील अधिकारी व्यक्तींची आवश्यकता लक्षात घेवून काम करताना सुलभ व्हावे आणि पदांची रचना तसेच अधिकाऱ्यांना करिअरमध्ये प्रगती करता यावी, याचा विचार करून पदांची फेररचना करण्यात आली आहे.
N.Sapre/S.Bedekar/Anagha