Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ इन्शुरन्स सुपरवायर्ज म्हणून ‘आयआरडीएआय’ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता, बहुपक्षीय सामंजस्य करार


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ इन्शुरन्स सुपरवायजर म्हणून ‘आयआरडीएआय’ला पूर्वलक्षी प्रभावाने मान्यता देण्यात आली. यासंदर्भात बहुपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला आहे.

इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ इन्शुरन्स सुपरवायजर ही आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती आणि सहकार्य करणारी जागतिक व्यवस्था आहे. एका बहुपक्षीय सामंजस्य कराराव्दारे या कार्यप्रणालीमध्ये भारतीय ‘आयआरडीएआय’आता सहभागी होवू शकणार आहे. वाढती वित्तीय बाजारपेठ, तसेच मोठ्या संख्येने कार्यरत असलेल्या विमा कंपन्या, म्युच्युअल फंड लक्षात घेता, माहितीची देवाण घेवाण करावी लागते. यासाठी बहुपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला आहे. यानुसार ‘आयआरडीएआय’ आता एक महत्वपूर्ण संस्था बनली आहे. यामुळे पैशाचे गैरव्यवहार, तसेच आर्थिक दहशतवादाला आळा घालणे शक्य होणार आहे.

N.Sapre/S.Bedekar/Anagha