पीएम्इंडिया
2015 नंतरच्या विकासाच्या मसुद्याचा स्वीकार यासंदर्भातल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधन केलं.
आर्थिक समावेशकता, वैयक्तिक उद्योग क्षेत्र आणि नवीकरणीय ऊर्जा यासह इतर क्षेत्रात विकासासाठी आपल्या सरकारनं उचललेल्या पावलांची माहिती त्यांनी दिली. न्याय्य पर्यावरणाची संकल्पना आपल्याला नैसर्गिक आपत्तीपासून गरीबांचा बचाव करण्याचा निर्धार दृढ करते असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम योंग किम यांची भेट घेतली. किम यांनी पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानाची प्रशंसा केली. पंतप्रधानांच्या नेतृत्वामुळे जगाच्या भारताकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात सकारात्मक बदल झाल्याचं ते म्हणाले. नवीकरणीय ऊर्जा, गंगा स्वच्छता आणि स्वच्छतागृह बांधण्याच्या क्षेत्रात सरकारची कटिबध्दता पंतप्रधानांनी विशद केली. जागतिक बँकेचा प्रशासकीय ढाचा या मुद्यावरही चर्चा झाली यामध्ये भारताला पुरेसं प्रतिनिधीत्व हवं असं पंतप्रधान म्हणाले. संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव बान की मून यांचीही पंतप्रधानांनी भेट घेतली. संयुक्त राष्ट्रसंघाची शांततेसाठीची कारवाई, तसंच संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेविषयक सुधारणांवर यावेळी चर्चा झाली. हवामान बदलविषयाच्या मुद्यावर विकसित आणि विकसनशील देशात विश्वासाचा अभाव दिसत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. सकारात्मक उद्दिष्टांवर भर असला पाहिजे केवळ कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर नव्हे असंही त्यांनी सांगितलं.
जॉर्डनमधल्या हॅशमाइट राज्याचे राजे अब्दुला द्वितीय बिन अल हुसेन याच्याशी प्रंतप्रधानांनी चर्चा केली. दहशतवाद आणि आयएसआयएसमुळे उद्भवणारा धोका या मुद्यांवर चर्चा झाली. दहशतवादाच्या मुद्यावर जागतिक प्रतिसादाची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली.
इजिजचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह इल सिसी यांच्याशी झालेल्या चर्चेत दहशतवादाला आळा घालण्याच्या मुद्याबाबत विचारविनिमय झाला.
सेंट ल्युसियाचे पंतप्रधान केनी डेव्हीस ॲन्थनी यांचीही पंतप्रधानांनी भेट घेतली.
N. Chitale/S.Tupe
My speech at the @UN. http://t.co/ltNznpXEIS #UNGA
— Narendra Modi (@narendramodi) September 25, 2015
Just before my speech at the @UN had a meeting with @UN @secgen Mr. Ban Ki-moon. pic.twitter.com/fPP8dnAFUK
— Narendra Modi (@narendramodi) September 25, 2015
Discussed India-Jordan cooperation in the meeting with HM King Abdullah II. pic.twitter.com/KHTuOZO7QA
— Narendra Modi (@narendramodi) September 25, 2015