पीएम्इंडिया
राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांच्या स्वागतप्रसंगी राज्यसभेच्या सदस्यांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले.
स्वागतपर भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधान म्हणाले की, आजच्या 11 ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र्य चळवळीतील तरुण क्रांतिकारक खुदीराम बोस यांना ब्रिटीशांनी फासावर चढवले. ते म्हणाले की, ही घटना स्वातंत्र्यासाठी लढलेल्यांच्या बलिदानाचे तसेच आपणा सर्वांवरच्या जबाबदारीचे स्मरण करुन देते. वेंकय्या नायडू हे स्वतंत्र भारतात जन्मलेले पहिले उपराष्ट्रपती आहेत असे पंतप्रधान म्हणाले. नायडू यांना प्रदीर्घ अनुभव असून संसदीय कामकाजाच्या गुंतागुंतीची त्यांना उत्तम जाण आहे असे ते म्हणाले.
वेंकय्या नायडू यांच्याबरोबरच्या प्रदीर्घ अनुबंधाचे स्मरण करताना पंतप्रधान म्हणाले की, ग्रामीण भाग, गरीब आणि शेतकरी यांच्या गरजांप्रति नायडू हे नेहमीच संवदेनशील असतात आणि त्यांच्या समस्यांबाबत नायडू यांनी दिलेली माहिती अतिशय उपयुक्त असते.
विनयशील आणि ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या व्यक्ती आज देशाच्या सर्वोच्च पदांवर विराजमान असून यातून भारतीय लोकशाहीची परिपक्वता आणि भारतीय संविधानाचे सामर्थ्य दिसून येते असे पंतप्रधान म्हणाले.
N.Sapre/S.Kane/P.Malandkar
I congratulate Shri @MVenkaiahNaidu on being sworn in as India’s Vice President.
— Narendra Modi (@narendramodi) August 11, 2017
Sharing my remarks in the Rajya Sabha, welcoming Vice President Shri @MVenkaiahNaidu. https://t.co/pkNkf9GeFi
— Narendra Modi (@narendramodi) August 11, 2017