Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी बिहारच्या मुख्यमंत्र्यांशी राज्यातील पूरस्थितीबाबत चर्चा केली, सर्वतोपरी मदत पुरवण्याचे बिहार सरकारला आश्वासन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी राज्यातील काही भागातील पूरस्थितीबाबत चर्चा केली.

पंतप्रधानांनी ट्विटरवरील संदेशात म्हटले आहे की, पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने बिहार सरकारला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

पंतप्रधान म्हणाले, “बिहारमधील पूरग्रस्तांच्या दु:खात मी सहभागी आहे. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

पूरस्थिती नियंत्रणात आणण्यसाठी केंद्र सरकारने बिहार सरकारला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. मदत आणि बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्या बिहारमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.”

N.Sapre/S.Kane/D.Rane