Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

दहिसर येथील भारतीय विमानतळ प्राधिकरणाची ४० एकर जमीन एमएमआरडीएकडे मेट्रो शेड साठी हस्तांतरित करायला मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने गोराई येथील राज्य सरकारच्या ४० एकर जमीनीच्या बदल्यात दहिसर येथील भारतीय विमानतळ प्राधिकरणाची ४० एकर जमीन एमएमआरडीएकडे मेट्रो शेड साठी हस्तांतरित करायला मंजुरी दिली. या व्यवहारामुळे एमएमआरडीएला मुंबईतील मेट्रो रेल्वे प्रकल्प पूर्ण करता येईल.

अटी :

१. एमएमआरडीए ४० एकर जमिनीच्या किमतीतील फरक , मुद्रांक शुल्क रेडी रेकनर दरानुसार ४७२. ७० कोटी रुपये किंवा जमीन हस्तांतरणाच्या वेळी जो रेडी रेकनर दर असेल यापैकी जो अधिक असेल त्यानुसार भरेल.

२. गोराई येथील जमिनीचे सीमा निर्धारण करून एमएमआरडीए हस्तांतरित करेल. तसेच त्याची सर्व कागदपत्रे सुपूर्द करेल.

३. भारतीय विमान प्राधिकरण किमान २ हजार चौ . मीटर जमीन तात्पुरत्या तत्वावर आधी हस्तांतरित करेल.

या प्रस्तावामुळे कुशल आणि निमकुशल कामगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, तसेच मेट्रो बांधकामातील सहभागी कारखान्यांमध्ये रोजगार निर्मिती होईल. मेट्रो कर शेड कार्यान्वित झाल्यावर थेट रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

N.Sapre/S.Kane/P.Kor