पीएम्इंडिया
बीएसएनएल म्हणजेच भारत संचार निगम लिमटेड आता मोबाईल म्हणजेच भ्रमणध्वनी सेवा देण्यासाठी उभारण्यात आलेल्या मनोऱ्यांच्या संपत्तीसाठी स्वमालकीची स्वतंत्र कंपनी स्थापणार आहे. यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
या निर्णयामुळे बीएसएनएल आता मनोऱ्यांसारखी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी, तसेच त्यासाठी निधी उभारण्यासाठी स्वतंत्र उपकंपनी तयार करू शकणार आहे.
देशभरामध्ये जवळपास 4,42,000 मनोरे आहेत. त्यापैकी बीएसएनएलचे 66,000 पेक्षा जास्त मनोरे आहेत. मनोरे निर्मितीसाठी स्वतंत्र उपकंपनी स्थापन केल्यानंतर चांगली सेवा देवून कंपनीच्या उत्पन्नामध्ये वृद्धी होण्यास मदत होणार आहे.
N.Sapre/S.Bedekar/D.Rane