पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यामध्ये अतिरिक्त 1 टक्का वृद्धीला मान्यता देण्यात आली. या निर्णयाचा लाभ केंद्रीय निवृत्तीवेतनधारकांनाही मिळणार आहे. ही वाढ 1 जुलै, 2017 पासून लागू होणार आहे.
सातव्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारसींनुसार हा अतिरिक्त महागाई भत्ता वाढविण्यात आला आहे.
वाढीव महागाई भत्त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर या आर्थिक वर्षामध्ये उर्वरित 8 महिन्यांच्या म्हणजे जुलै 2017 ते फेब्रुवारी 2018 या काळात 3068.26 आणि 2045.50 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. याचा लाभ 49.26 केंद्रीय कर्मचारी आणि 61.17 लाख निवृत्ती वेतनधारकांना मिळणार आहे.
N.Sapre/S.Bedekar/Anagha