Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि अर्मेनिया यांच्यामधील आपत्ती व्यवस्थापन सहकार्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारत आणि अर्मेनिया यांच्यामधील आपत्ती व्यवस्थापन सहकार्य कराराला मान्यता देण्यात आली.

या करारामुळे दोन्ही देशांमध्ये आपत्ती आल्यास नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आणि बचाव करण्यासाठी सहकार्य करण्यात येणार आहे. त्याच बरोबर आपत्तीसंबंधी माहितीची देवाण-घेवाण करण्यात येणार आहे.

भारत आणि अर्मेनिया या दोन्ही देशांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा उभी करणे तसेच कोणत्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याबरोबरच क्षमता वाढवण्यासाठी उभय देशांमध्ये सहकार्य करण्यात येणार आहे.

N.Sapre/S.Bedekar/Anagha