Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रेल्वे कर्मचाऱ्यांना उत्पादकतेशी संलग्न बोनस दसऱ्यापूर्वी द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्व पात्र अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना (आरपीएफ/आरपीएसएफ कर्मचारी वगळून) 2016-17 या आर्थिक वर्षासाठी 78 दिवसांच्या वेतनाइतका उत्पादक संलग्न बोनस द्यायला मंजुरी दिली आहे. या निर्णयाचा लाभ सुमारे 12.30 लाख अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. हा बोनस दसऱ्यापूर्वी लाखो कुटुंबांना दिला जाईल. उत्पादकता संलग्न बोनस, रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खास करून रेल्वेच्या परिचालन आणि क्रियान्वयनमध्ये सहभागी कर्मचाऱ्यांना उत्पादकता सुधारण्यासाठी तसेच रेल्वे प्रवाशांची सुरक्षा, रेल्वेचा वेग आणि सेवा सुनिश्चित करण्यासाठी यामुळे मदत होईल.

रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस देण्यासाठी 2245.45 कोटी रुपये अतिरिक्त खर्च येईल. उत्पादकता संलग्न बोनस देण्यासाठी वेतनाची मर्यादा मासिक 7000 रुपये निर्धारित केली आहे. प्रत्येक पात्र रेल्वे कर्मचाऱ्याला कमाल 17 हजार 951 रुपये बोनस स्वरुपात मिळतील.

N.Sapre/S.Kane/P.Kor