पीएम्इंडिया

आपल्या देशात आणि जगभरात टपाल तिकीटांचे एक महत्व आहे. एका प्रकारे टपाल तिकटे त्यांच्यात इतिहास सामावून घेतात. तसेच टपाल तिकीटे एका प्रकारे राजदूताचेही काम करतात. जगातल्या कुठल्याही देशात आपले जे टपाल जाते आणि त्याच्यावर जे तिकीट असते. जगात असे अनेक जण आहेत, जे ही तिकीटे संग्रही ठेवतात आणि कधी-कधी टपाल तिकीटांच्या संग्रहामधून कळून येते की त्या देशात कोणकोणत्या प्रकारचे बदल झाले आहेत. म्हणजेच एका अर्थाने ही तिकीटे परिचय देणारी असतात. भारताचा टपाल विभागही कायम अशा प्रकारचे योगदान देत आला आहे.
आज प्रभू रामचंद्रजींच्या जीवनाशी संबंधित एका टपाल तिकीटाचे अनावरण होत आहे. आता हे काम मी दिल्लीत विज्ञान भवनात किंवा पंतप्रधानांच्या निवासस्थानी करु शकलो असतो. पण मनात विचार आला नवरात्रीचे पावन पर्व आहे आणि रामचंद्रजींच्या जीवनात नवरात्र आणि विजयादशमीचे विशेष महत्व आहे आणि तुलसीदास यांच्या स्मृती आजही जिवंत असणाऱ्या या मानसमंदिरापेक्षा या तिकीटाच्या लोकार्पणासाठी आणखी इतर कुठलही मोठे स्थान असू शकत नाही. मला काशीला यायचे होते, तेव्हा मी टपाल खात्याशी चर्चा करुन हे निश्चित केले. रामजींवर तर खूप टपाल तिकीटे निघाली आहेत. परंतु हा असा पहिलाच तिकीट संग्रह आहे, ज्यामध्ये प्रभू रामचंद्रजींच्या जीवनाच्या अनेक पैलूंना वेगवेगळ्या टपाल तिकीटांच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आले आहे. हे एकच तिकीट वाटत असले, तरी त्यात अनेक तिकीटांचा संग्रह आहे. त्यामुळे एका प्रकारे प्रभू रामजींच्या जीवनावरील अशा टपाल तिकीटाचे या पूर्वी कधीही प्रकाशन झाले नव्हते. आज पहिल्यांदाच अशा प्रकारे प्रकाशन होत आहे. मला आनंद वाटतो की ‘मानस’च्या पवित्र भूमिवर हे काम करण्याची संधी मिळाली आहे. आणि प्रभू रामचंद्रजींचं जीवन प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरक आहे.
जर आपण महात्मा गांधींचे स्मरण केले तर बालपणापासूनच प्रभू राम त्यांच्या आयुष्याचा एक मंत्र झाले होते. असे महापुरुष, असे चेतनापुरुष आजही ज्यांच्या जीवनाचा प्रत्येक पैलु समाज व्यवस्थेसाठी उपकारक आहे, हे आपल्या सर्वांना प्रेरणा देत आहेत. मी प्रभू रामचंद्रजींच्या चरणांना वंदन करुन भारत सरकारच्या वतीने हे टपाल तिकीट आज नवरात्रीच्या पावन प्रसंगी देशाला अर्पण करत आहे. मी माझा आनंद जाहीर करतो आणि इथे आल्याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद देतो.
S.Tupe/J.Patankar/D.Rane
Released postage stamps on the Ramayana. pic.twitter.com/E6wYPh2hmy
— Narendra Modi (@narendramodi) September 22, 2017
Honoured to pray at the Tulsi Manas Mandir, one of Kashi’s historical temples. pic.twitter.com/7RYqFVl59Q
— Narendra Modi (@narendramodi) September 22, 2017