Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

प्रमुख स्वामी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांची त्यांना आदरांजली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रमुख स्वामी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.
पंतप्रधान म्हणाले, “जगभरातील लाखो भक्तांमध्ये मी सामील होतो आणि प्रमुख स्वामी महाराज यांच्या जयंतीदिनी त्यांना वंदन करतो. ते असाधारण आत्मा होते, ज्यांच्या सेवा आणि मानवतावादी प्रयत्नांनी अगणित लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडला.

प्रमुख स्वामी महाराज यांचे समृध्द विचार यापुढेही सर्वांना मार्गदर्शक ठरतील. गरजू, गरीब आणि वंचितांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याच्या त्यांच्या विचारांनी आपल्याला नेहमीच प्रोत्साहित केले आहे.
प्रमुख स्वामी महाराज यांच्याबरोबरचे माझे नाते विशेष आहे. त्यांच्या बरोबर व्यतित केलेला वेळ अविस्मरणीय होता. मी सुदैवी आहे, मला त्यांचा आशीर्वाद लाभला. गेल्‍यावर्षी सारंगपूर येथे मी त्यांच्याविषयी जे बोललो ते https://www.youtube.com/watch?v=azaYIrMsx5gया लिंकवरऐकता येईल”, असे पंतप्रधान म्हणाले.

N.Sapre/S.Kane/Anagha