पीएम्इंडिया
भारत आणि ब्राझील यांच्यातल्या गुंतवणूक सहकार्य आणि सुविधा करारावर स्वाक्षऱ्या करायला आणि त्याला मान्यता द्यायला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली.
या करारामुळे दोन्ही देशातला गुंतवणुकीचा ओघ वाढणार आहे. हा करार, ब्राझीलमधल्या गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करायला तर भारतातल्या गुंतवणूकदारांना ब्राझीलमध्ये गुंतवणूक करायला योग्य त्या सुविधा पुरवणार आहे.गुंतवणूकदारांना, गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण पुरवून त्यांचा आत्मविश्वास वाढायला यामुळे मदत होणार आहे. ब्राझीलमधल्या गुंतवणूकदारांना, थेट परकीय गुंतवणुकीसाठी, भारत हे अग्रक्रमांचे ठिकाण व्हायलाही मदत होणार आहे.
N.Sapre/N.Chitale/Anagha