पीएम्इंडिया
ईशान्येसाठीची सध्याची 5300 कोटी रुपयांची नॉन लॅप्सेबल सेंट्रल पूल ऑफ रिसोर्सेस अर्थात एनएलसीपीआर योजना मार्च 2020 पर्यंत सुरु ठेवायला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत 90 :10 या प्रमाणात निधी पुरवला जातो. यामुळे सुरू असलेले प्रकल्प पूर्ण व्हायला मदत होणार आहे.
ईशान्य विशेष पायाभूत विकास योजना ही नवी योजना 2017 -18 पासून सुरु करायलाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.यासाठी केंद्र सरकार 100 % निधी पुरवणार असून विशिष्ट क्षेत्रात पायाभूत निर्मितीतली दरी कमी करण्यात येणार आहे.
N.Sapre/N.Chitale/P.Kor